तरुणांनी स्वयंरोजगारासह व्यवसायाकडे वळावे :आमदार संग्राम जगताप

। अहमदनगर । दि.30 सप्टेंबर ।-तरुणांनी स्वयंरोजगारासह व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून स्वतःची व समाजाची प्रगती करावी, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. सबजेल चौकात नव्याने सुरु झालेल्या अ‍ॅपल फोटो स्टुडिओच्या कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी केले.

शहरातील अनिकेत पवार, महेश कराळे, केतन खरपुडे, ओंकार जाधव या चार तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगारासह व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून स्वतःचा फोटो स्टुडिओ सुरु केला आहे. त्यांच्या या प्रयत्नांना दाद देताना आ. जगताप यांनी या स्टुडिओचे उदघाटन केले व चौघांचेही विशेष कौतुक केले. 

यावेळी टीकटॉक अभिनेत्री अनुश्री माने उपस्थित होत्या. त्यांनीही चौघाही युवकांच्या प्रयत्नांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सबजेल चौकातील नागरिक व विविध स्तरातील प्रतिष्ठीत नागरिकांसह पवार,कराळे, खरपुडे,जाधव यांच्या कुटुंबीय उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post