। मुंबई । दि.02 सप्टेंबर । ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्यासोबत गेली कित्येक वर्षे एकत्र राहणार्या अभिनेत्री सायरा बानो यांना आता श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आहे. दिलीप कुमार यांचे निधन होऊन दोन महिने झाले आहेत. परंतु त्यांच्या मृत्यूच्या दुःखातून अजूनही त्या सावरु शकल्या नाही.
याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. सायरा बानो यांची प्रकृती स्थिर आहे. परंतु त्यांचा बीपी काही नॉर्मल होत नाही. त्यांची ऑक्सिजन लेव्हल लो असून यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे.
त्यामुळे अजूनही तीन ते चार दिवस त्यांना रुग्णालयात राहावे लागणार आहे. दिलीप कुमार यांच्या मृत्यूने सायरा बानो पूर्णपणे खचल्या आहेत. दरम्यान, दिलीप कुमार यांच्या अंत्यदर्शनाची काही छायाचित्रे समोर आली होती, जी खूप भावनिक होती. या फोटोंमध्ये अभिनेत्री सायरा पती दिलीप कुमार यांच्या पार्थिवाला शेवटचे बिलगून रडताना दिसल्या होत्या.

Tags:
Maharashtra