उपनगरामध्ये गहाळ झालेली दागिने असलेले पर्स तोफखाना पोलिसानी दिली महिलेला शोधून

। अहमदनगर । दि.11 सप्टेंबर । अहमदनगर शहरातील झोपडी कॅन्टिन परिसरात महिलेची गहाळ झालेली 2.5 तोळे सोन्याचे दागिने असलेली पर्स तोफखाना पोलीसांनी काही तासातच शोध घेवुन त्या महिलेस सुपुर्त केली.

त्यामुळे सदर महिलेच्या चेहर्‍यावरील काळजीचे सावट दूर होवून तिचा चेहरा आनंदाने उजळून निघाला. याबाबतची माहिती अशी की, तुप्ति अमोल घाडगे (रा. तळोजा पनवेल जि. रायगड) या त्यांच्या बहिणीकडे नगरला आल्या होत्या.

त्या आपल्या बहिणीसोबत ज्युस पिण्यासाठी रॉयल ज्युस सेंटर, झोपडी कॅन्टिन येथे आल्या असता त्यांनी त्यांचेकडील 2.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागीने व काही रोख रक्कम पर्समध्ये ठेवलेले होते. ती पर्स येताना रस्त्यात कोठेतरी गहाळ झाले होती.

त्यानंतर तृप्ती या पोलीस स्टेशनला गेल्या असता तोफखाना पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी त्यांचेकडील नेमणुकीचे पो.उप निरीक्षक समाधान सोळंके, शकिल सय्यद, शैलेश गोमसाळे, अमोल शिरसाठ,

अकिब इनामदार यांना तात्काळ सदर पर्सचा शोध घेणेकामी रवाना केले. या पथकाने काही तासातच सदर पर्सचा व त्यातील दागीने व रोख रक्कम याचा शोध घेवुन सदरची पर्स हि सुस्थितीत महिलेच्या ताब्यात दिली.

Post a Comment

Previous Post Next Post