। अहमदनगर । दि.11 सप्टेंबर । उधारीच्या पैशाच्या कारणावरुन एका महिलेसह तिघांच्या डोळ्यात मिरची पूड फेकत चाकू व लोखंडी गजाने जबर मारहाण करत त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यातील पोखर्डी गावात बुधवारी (दि.8) रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत प्रकाश शंकर देठे (रा.पोखर्डी, ता.नगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, गावातील बाळू भीमराज जाधव, दत्तू भीमराज जाधव, भीमराज जाधव, सोनाली जाधव हे सर्व जण आपला भाऊ गोरख देठे याच्या घरासमोर आले व उधारीच्या पैशावरुन वाद घातला. आरोपी सोनाली जाधव हिने तिच्या हातातील मिरची पूड आपला भाऊ गोरख देठे व त्याची पत्नी नंदा देठे यांच्या डोळ्यात फेकून इतर
तिघांनी त्यांच्या हातातील चाकुने व लोखंडी गजाने त्यांना मारहाण केली. आपण त्यांना सोडविण्यासाठी गेलो असता आपणासही लोखंडी गजाने मारहाण करण्यात आली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी चौघा जणांविरुद्ध भा.दं.वि.क. 307, 323, 504, 324 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Tags:
Crime