। अहमदनगर । दि.16 सप्टेंबर । दिल्लीगेट येथील ज्युस सेंटरचे नुकसान करून एकाला मारहाण केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम व त्याचा भाऊ श्रीकांत या दोघांना पोलिसांनी अटक केली.
या दोघांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची (दि. 20 पर्यंत) पोलीस कोठडी सुनाविण्यात आली असल्याची माहिती तपासी अधिकारी व शहराचे पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांनी दिली.
भगीरथ भानुदास बोडखे यांच्या फिर्यादीवरून छिंदम बंधूसह इतर चाळीस जणांविरुध्द मारहाण करणे, अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला होता.
त्यातील काही जणांना अटकपूर्व जामिन मंजूर झाला होता. श्रीपाद व श्रीकांत छिंदम या दोघांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला होता.
हे दोघे दिल्लीगेट भागात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे व इतर कर्मचार्यांनी दोघांना अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले आहे. छिंदम बंधूवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे.
त्यामुळे त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची विनंती तपासी अधिकारी ढुमे यांनी न्यायालयाकडे केली होती. दोघांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.