। अहमदनगर । दि.15 सप्टेंबर । बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोराने आत प्रवेश केला व आतील सामानाची उचकापाचक केली. घरातील पंधरा हजार रुपये किमतीचा बत्तीस इंची एलईडी टीव्ही संच चोरून नेला. ही घटना भिंगार परिसरातील बुर्हाणनगर येथील संकल्प कॉलनीमध्ये घडली.
याबाबतची माहिती अशी की संतोष शिवाजी हरिश्चंद्रे (वय 35, राहणार धामोरी, तालुका राहुरी. हल्ली राहणार संकल्प कॉलनी, बुर्हाणनगर, भिंगार) हे त्यांच्या कुटुंबासह रात्री झोपलेले असताना कोणीतरी अज्ञात चोराने त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप व कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला.

आतील सामानाची उचकापाचक केली व घराच्या भिंतीवर असलेला पंधरा हजार रुपये किमतीचा 32 इंची एलइडी टीव्ही चोरून नेला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याची गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस नाईक गंगावणे करीत आहे.