। अहमदनगर । दि.15 सप्टेंबर । येथील पारनेर बाजार समितीत कांद्याचे लिलाव आज (बुधवारी) झाले. कांद्याची आवक साडेनऊ हजार गोण्या झालेली आहे. एक नंबर कांद्याला 17 हजार 500 रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. मागील लिलावाच्या तुलनेत कांद्याच्या भावात 50 रुपयांनी घसरण झाली असल्याचे दिसून आले आहे.
आज पारनेर बाजार समितीत नऊ हजार 439 कांदा गोण्यांची आवक झाली होती. यामध्ये एक नंबर कांद्याला 1600 ते 1750, दोन नंबर कांद्याला 1300 ते 1500, तीन नंबर कांद्याला एक हजार ते 1200 व चार नंबर कांद्याला 200 ते 900 रुपयांचा भाव प्रतिक्विंटल मिळाला आहे.
रविवारी कांद्याच्या आठ हजार 194 गोण्यांची आवक झाली होती. एक नंबर कांद्याला 1600 ते 1800 रुपयांचा भाव मिळाला होता. मात्र आज बुधवारी 1750 रुपयेच मिळाला आहे. शेतकर्यांनी कांद्याची प्रतवारी करूनच कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन पारनेर बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.
Tags:
Ahmednagar
