। अहमदनगर । दि.15 सप्टेंबर । माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम व त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम यांना तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे.दिल्लीगेट येथील ज्यूस सेंटर चालकास जातीवाचक शिविगाळ प्रकरणी दाखल गुन्ह्यात ही कारवाई झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी दिली.
श्रीपात छिंदम, श्रीकांत छिंदम बंधूंसह महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे व इतर 30 ते 40 जणांवर भगिरथ भानुदास बोडखे यांच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. छिंदम बंधूंसह चार जणांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.
हा अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. त्यावर न्या. सुरेंद्र पी. तावडे यांच्यासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने फेटाळल्यानंतर बुधवारी सकाळी श्रीपाद छिंदम व श्रीकांत छिंदम यांना अटक करण्यात आली आहे.
महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे यांना प्रत्येकी 15 हजारांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यांना 15 सप्टेंबरपर्यंत दररोज पोलिस ठाण्यात हजेरीचे आदेश आहेत.