तहसीलदार ज्योती देवरे यांची बदली

। अहमदनगर । दि.14 सप्टेंबर । ज्योती देवरे या ऑगस्ट 2018 मध्ये तहसीलदार म्हणून पारनेर येथे रूजू झाल्या होत्या. पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अँडिओ क्लिपमुळे संपूर्ण जिल्हा ढवळून निघाला होेता. सोमवारी अखेर तहसीलदार ज्योती देवरे यांची बदलीचे आदेश जारी करण्यात आलेला आहे.

तहसीलदार ज्योती देवरे यांची अँडिओ क्लिप व्हायरल झालेली होती. यामुळे राज्यात खळबळ उडाली होेती. त्यामुळे या प्रकरणात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या प्रकरणात देवरे यांच्याविरोधातही काही तक्रारी होत्या.

तसेच देवरे यांनीही तक्रार केली होती. या तक्रारींची चौकशी करण्यात आली. त्यात तथ्य दिसून आले नाही. देवरे यांची सोमवारी बदली झाल्याचा आदेश जारी करण्यात आलेला आहे.

ज्योती देवरे यांच्या बदलीचा आदेश सोमवारी राज्य शासनाचे सहसचिव डॉ.माधव वीर यांनी काढला आहे. देवरे यांच्या जागी आता जळगाव येथील नामदेव पाटील यांची पारनेर तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचा आदेशही जारी करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post