। अहमदनगर । दि.16 सप्टेंबर । भरधाव वेगात पाथर्डीकडे जाणार्या अज्ञात वाहनाने रस्त्याने जाणार्या 33 वर्षीय तरुणास धडक दिली. या धडकेत तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. ही घटना पाथर्डी तालुक्यातील मालेवाडी-खरवंडी बायपास येथे घडली.
याबाबतची माहिती अशी की रामदास भीमसेन कीर्तने (वय 33, राहणार मालेवाडी-खरवंडी बायपास, पाथर्डी) हा ऊस आणण्यासाठी गेला असता बायपास रोडवर पाथर्डीकडे जाणार्या अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. या धडकेत डोक्याला गंभीर मार लागल्याने रामदास कीर्तने याचा मृत्यू झाला.
अपघात होताच अज्ञात वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी पोलिसांनी रुक्मिणी भीवसेन कीर्तने यांच्या फिर्यादीवरून अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार बाबर करीत आहे.
Tags:
Ahmednagar
