। अहमदनगर । दि.03 सप्टेंबर । महानगरपालिका प्रशासनाने कर्मचार्यांना दिवाळी बोनस व सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी मनपा कामगार युनियनने केली आहे. मनपा प्रशासनाने या संबधी निर्यण न घेतल्यास दि.19 सप्टेंबरपासून संपावर जाण्याचा इशारा युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी दिली आहे.
मनपा कामगार युनियनचे अध्यक्ष लोखंडे व सरचिटणीस आनंद वायकर यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांना संपाची नोटीस पाठविली आहे. दि. 4 नोव्हेंबर रोजी दिवाळी सण असल्याने मनपातील सर्व कामगारांना सन 2020-21 या वर्षीसाठी त्यांच्या सर्व भत्त्यासह होणार्या वार्षिक मिळकतीच्या 20 टक्के बोनस म्हणून
दिवाळी सणापूर्वी अदा करण्यात यावा तसेच मनपातील सर्व कायम, रोजंदारी व मानधनावरील कामगारांना दिवाळी सणासाठी सानुग्रह अनुदानापोटी 20 हजार रुपये दिवाळी सणापूर्वी विनाअट देण्यात यावेत, अशी मागणी मनपा प्रशासनाकडे करण्यात आली. मनपा प्रशासनाने याबाबत निर्णय न घेतल्यास संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Tags:
Ahmednagar