एटीएम कार्ड क्लोम करून फसवणूक करणार्‍या टोळीचा मुख्य आरोपी सायबर पोलिसांनी केले जेरबंद

 । अहमदनगर । दि.16 सप्टेंबर । कार्ड क्लोन करुन लाखोंची रक्कम एटीएम मशिनव्दारे काढून फसवणूक करणार्‍या टोळीचा मुख्य आरोपी सायबरच्या पथकाने ठाणे येथून जेरबंद केले. फिर्यादी व साक्षीदार यांचे एटीएम कार्ड क्लोन करुन त्यांचे दुसरे एटीएम बनवुन ते वेगवेगळ्या एटीएममध्ये वापरुन त्यामधुन फिर्यादी व साक्षीदार यांचे पैसे काढुन 1 लाख 44 हजार रुपयांची फसवणुक केली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या नेतृत्वाखाली पोसई प्रतिक कोळी, योगेश गोसावी, उमेश खेडकर, दिंगबर कारखेले, मलिक्कार्जुन बनकर, राहुल हुसळे, विशाल अमृते अरूण सांगळे, गणेश पाटील, वासुदेव शेलार सायबर पोलीस स्टेशन यांचे पथकाने सदर गुन्हयाचे तांत्रीक विश्लेषण करून धिरज अनिल मिश्रा, सुरज अनिल मिश्रा रा नायगाव मुंबई यांना टोकावडे ता ठाणे येथून ताब्यात घेण्यात आले होते.

आरोपी कडून 31 बनावट एटीएम कार्ड, दोन लाख 61 हजार 500 रुपये हस्तगत केले. आरोपीने त्यांचा मुख्य साथीदार सुजित राजेंद्र सिंग रा.वसई जि. पालघर याचे सांगणेवरून सदर गुन्हा केल्याचे सांगीतले. सुजित राजेंद्र याने गुन्हयाची कबूली देवून त्याचेकडून गुन्हयात वापलेला एक लॅपटॉप, 5 मोबाईल हॅण्डसेट, एक कॉम्प्युटर, 7 पेनड्राईव्ह 4 एटीएम कार्ड क्लोन करण्याकरीता लागणारे स्किमर मशिन,

एक कलर प्रिंटर, 54 बनावट ए.टी.एम कार्ड, 46 कोरे बनावट कार्ड ढच् कार्ड तयार करण्यासाठी लागणारे, 6 विविध कंपन्याचे सिम कार्ड असा 47 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदर आरोपीवर अहमदबाद, सुरत गुजरात, मुंबई येथे अशाच स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

Post a Comment

Previous Post Next Post