। अहमदनगर । दि.24 सप्टेंबर । पारनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या साडेसहा हजार गोण्यांची आवक झाली. मागील लिलावाच्या तुलनेत आज कांद्याला 200 रुपयांचा जास्त भाव मिळाला आहे. गेल्या अनेक लिलावांच्या तुलनेत हा विक्रमी भाव मानला जात आहे. कांद्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकरी खुश झाला आहे.
पारनेर बाजार समितीत आज (शुक्रवारी) कांद्याच्या सहा हजार 733 कांदा गोण्यांची आवक झाली होती. एक नंबर कांद्याला 2400 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. मागील लिलावाच्या तुलनेत आज कांद्याच्या भावात दोनशे रुपयांनी वाढ झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. कांद्याला चांगला भाव मिळेल, अशी आशा आता शेतकर्यांना लागली आहे.
कांद्याचे प्रतवारीनुसार भाव ः एक नंबर कांदा ः 2100 ते 2400, दोन नंबर कांदा ः 1500 ते 2000, तीन नंबर कांदा ः एक हजार ते 1400, चार नंबर कांदा ः 200 ते 900. आज झालेल्या लिलावामध्ये एक व दोन नंबर व तीन कांद्याच्या भावात वाढ झालेली आहे. चार नंबर कांद्याचे भाव मागील लिलावा प्रमाणेच होते. त्यात काहीच वाढ झालेली नाही.
शेतकर्यांनी कांदा विक्रीस आणताना त्याची प्रतवारी करून आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड व संचालक मंडळाने केलेले आहे.

Tags:
Ahmednagar