। कोल्हापूर । दि.14 जून । अजित पवार आणि श्रीमंत शाहू छत्रपती यांची ही भेट नियोजित नव्हती. आज सकाळी अजित पवार अचानकपणे शाहू छत्रपती यांच्या भेटीसाठी न्यू पॅलेस येथे दाखल झाले. गेल्या पाऊणतापासून ही बैठक सुरु आहे. या बैठकीला मराठा समाजाचे काही नेतेही उपस्थित असल्याचे समजते. 16 जूनला कोल्हापुरातून मराठा मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकीत काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या भेटीनंतर अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्याच्या कामाला लागतील. सध्या कोल्हापूर हा राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे कोल्हापूरचा दौरा करणार आहेत.
गेल्या अनेक दिवसापासून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर रान पेटवले जात आहे. त्यातच आता 16 जून पासून कोल्हापुरातून मराठा आंदोलनाची सुरवात होणार असल्याची घोषणा छत्रपती संभाजी महाराज यांनी म्हंटले आहे. मात्र, या सर्व घटनाक्रमांमध्ये आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार थेट छत्रपती शाहू महाराज यांची भेट न्यू पॅलेस येथे घेतली. यातुन या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
