माळीवाडा येथील रहिवासी ऋतिका उत्तम कर्पे हिला डोकेदुखीच्या त्रासामुळे दवाखान्यात दाखल केल्यावर तिच्या मेंदुवर शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. वर्पे परिवाराने पैशांची कशीतरी जमवाजमव करुन मेंदूचे एक ऑपरेशन केले. परंतु दुसरे ऑपरेशन करणे आवश्यक असल्याने त्यासाठी मोठा खर्च डॉक्टरांनी सांगितला.
वर्पे परिवाराची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने दुसर्या ऑपरेशनसाठी पैसे जमविणे त्यांना अवघड झाले होते. ही माहिती शिवसेनेचे माजी शहरप्रमुख कदम व कावरे यांना समल्यानंतर त्यांनी वर्पे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला व पैशांची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर याबाबत संबंधितांना माहिती दिली. त्यामुळे शिवसेना नगरसेवकांनी मदतीचा हात पुढे करीत सुमारे 2 लाख 8 हजार रुपये जमा करुन हा मदतीचा धनादेश वर्पे परिवाराकडे सुपूर्त केला आहे.
यावेळी कदम म्हणाले की, जमा झालेल्या मदतीमधून वर्पे कुटुंबाला मदतीचा हात देण्याचा आमचा प्रयत्न असून ऋतिका हिच्या ऑपरेशसाठी मदत जमा केली जमा झालेल्या मदतीतून तिचे ऑपरेशन यशस्वी होईल व ती बरी होईल या कुटुंबांच्या पाठिशी आम्ही उभे राहू असे ते म्हणाले.
तर कावरे म्हणाले की, मदत करणे हे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे, ही भावना मनात ठेवून वर्पे कुटूंबियांना मदत केली आहे. कोणत्याही चांगल्या कामांना अनेकांचा हातभार लागत आसतो, त्याची प्रचिती या निमित्ताने आली. शिवसेना नेहमीप्रमपाणे सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी झाली आहे. ऋतिका हिचे ऑपरेशन होऊन ती पुर्वीप्रमाणे आनंदी राहिल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.