। अहमदनगर । दि.07 मे । श्रीरामपूर शहरातील मेनरोड वरील साई सुपर मार्केट कॉम्प्लेक्स गच्चीवरून पडून अभिजीत दीपक सुखदरे,25 या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही गुरुवारी सायंकाळी सहा वाजता घडली.
मिळालेली माहिती अशी की, अभिजित हा मित्रांसह साई सुपर मार्केट या कॉम्प्लेक्सच्या समोरील मोकळ्या पटांगणात क्रिकेट खेळत होता.
त्यावेळी पोलिस आल्याचे कळताच अभिजित हा साई सुपर मार्केटच्या गच्चीवर जाण्यासाठी जिन्याने वर गेला आणि चौथ्या मजल्यावरून त्याचा तोल जाऊन तो कॉम्प्लेक्सच्या वरील पत्र्यातून खाली फरशीवर पडला.
अभिजित पडल्याचे लक्षात येताच लोक जमा झाले आणि त्यांनी म्बुलन्सला संपर्क केला अर्धा तास उशिराने म्बुलन्स आली व अभिजीतला साखर कामगार रुग्णालयात नेले. उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
