। अहमदनगर । दि.16 एप्रिल । भरधाव वेगात जाणाऱ्या पिकप जीपने ( क्र.एम एच 12 एस एफ 8133) पुढे चालणाऱ्या कंटेनरला पाठीमागून जोरात धडक दिली.
या धडकेत शशिकांत शिवाजी वाल्हेकर (वय 28 राहणार डोंणजे त. हवेली जि. पुणे ) हे जागीच ठार झाले. ही घटना पुणे-नाशिक महामार्गावर हॉटेल समोर खंदरमाळवाडी शिवारात घडली.
याप्रकरणी निलेश विलास वालेकर (वय.37 राहणार डोणजे हवेली पुणे यांच्या फिर्यादीवरून अपघातात याची नोंद किती अधिक तपास पोलीस हवालदार खेडकर हे करीत आहेत.
