। अहमदनगर । दि.23 एप्रिल । येथील नगर-मनमाड रोडने भरधाव वेगात जाणार्या अज्ञात वाहनाने समोरून येणार्या मालट्रकला धडक दिली. या धडकेत मालट्रक चालकाचा मृत्यू झाला. ही घटना नगर निंबळक बायपास रोड परिसरात घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की नरेंद्र सिंह प्रल्हाद सिंह मेहरा (वय 30, रा. डूनी गांगोल) हा त्याचा मालट्रक घेऊन नगर मनमाड रोड निंबळक बायपास रोड परिसरातून जात असताना वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली.
या जोराच्या धडकेत ट्रकचालक नरेंद्र सिंह मेहरा याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात होताच अज्ञात वाहन चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी महिपाल सिंह आनंद सिंह स्वाती (रा.उत्तराखंड ) यांच्या फिर्यादीवरून अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कणसे हे करीत आहेत.
