। अहमदनगर । दि.22 एप्रिल । नगर कल्याण रोड भरधाव वेगात जाणार्या मारुती सुझुकी बलेरो कारने रस्त्याने पायी जाणार्या पादचार्यास पाठीमागून जोरात धडक दिली. या धडकेत पादचार्याचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना नगर कल्याण रोड वरील टाकळी खातगाव येथे शनिवारी ( दि.17 ) रात्री साडेआठ वाजता घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की अहमद वजीर शेख (रा.टाकळी खातगाव) हे टाकळी गावातून त्यांच्या घराकडे नगर - कल्याण रोड पायी जात असताना त्यांच्या घराजवळ आले असता.
नगर कडून भरधाव वेगात आलेल्या मारुती सुझुकी बलेनो कार (क्र.एम एच 12 क्यू एम 5711) ने त्यांना पाठीमागून जोरात धडक दिली.
या अपघातात अहमद शेख हे गंभीर जखमी झाले होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.अपघात होताच कार चालक घटनास्थळावरून पसार झाला.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी इरफान अहमद वजीर शेख (वय 32 टाकळी खातगाव ता.नगर ) यांच्या फिर्यादीवरून भा द वि कलम 304 ( अ ) 279, 337, 338, 427
मोटार वाहन कायदा कलम 184, 134 (अ ) ( ब ) 177 प्रमाणे अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास पोलीस हवालदार सय्यद हे करीत आहेत.