पानाच्या दुकानातून दारूसाठा जप्त ; तोफखाना पोलिसांची कारवाई

। अहमदनगर । दि.22 एप्रिल । पानाच्या दुकानात बेकायदेशीररित्या लपवून ठेवलेल्या दारू साठ्यावर छापा टाकून मोठा साठा जप्त केला. ही कारवाई तोफखाना पोलिसांनी गुरुवारी (दि.22) केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, राज्यात विक्रीस प्रतिबंध असताना नगर शहरातील भिस्ताबाग चौकातील वृद्धेश्‍वर पानस्टॉलमध्ये एक जणाने देशी दारूचा साठा लपवून ठेवला आहे.

तो तेथूनच बेकायदेशीर विक्री करीत असल्याबाबत तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस.पी.गायकवाड यांना खबर्‍यामार्फत माहिती मिळाली.

तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिलेल्या सूचनेनुसार तोफखाना पोलिस पथकाने भिस्तबाग चौक येथे सापळा रचून शिवा गोपाळ शर्मा (वय 25, रा.श्रमिकनगर पाईपलाईन रोड,नगर) याला ताब्यात घेतले.

शर्मा याने लपवून ठेवलेला वृद्धेश्‍वर पान स्टॉलमधील 47 हजार 424 रुपयाचे संजीवनी देशी दारूचे 19 बंद बॉक्स काढून दिले. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी शर्मा व त्याचा मालक काशिनाथ बबन शिंदे याच्याविरुद्ध पो.कॉ. शैलेश गोमसाळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सुनील गायकवाड यांनी दिलेल्या सूचनेनुसार

तोफखान्याचे सहायक पोलीस निरिक्षक पिंगळे, सहायक फौकदर आढाव, पोलीस हेड कॉन्स्टेबल काळे, पोलीस कॉन्स्टेबल शैलेश गोमसाळे, जावेद शेख, संतोष राठोड, चालकपोलीस कॉन्स्टेबल नरसाळे आदींच्या पथकाने  केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post