। अहमदनगर । दि.22 एप्रिल । शेतातील विद्युत डीपीवरून अज्ञात चोराने चार हजार रुपये किमतीची एल टी अल्युमिनयमची तार कोणीतरी अज्ञात चोराने चोरुन नेली. ही घटना राहुरी तालुक्यातील तांबळेश्वर शिवारात घडली.
या बाबतची माहिती अशी की राहुरी तालुक्यातील तांबळेश्वर येथील खाटेकर यांच्या शेतातील विद्युत पुरवठा करणार्या डीपीची फ्यूज काढून कोणीतरी अज्ञात चोराने विद्युत वाहक पोलवरील चार हजार रुपये किमतीची एल टी अल्युमिनियम तार चोरुन नेली.
या प्रकरणी पोलिसांनी सोमनाथ भीमा चव्हाण (रा.लोणी तालुका राहता) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भा.द. वि. कलम 379 प्रमाणे चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस हवालदार आव्हाड हे करीत आहेत.
