। अहमदनगर । दि.21 एप्रिल । बंद घराची दरवाजाला कुलूप लावलेला कोयंडा कशानेतरी उचकाटून अज्ञात चोराने आत प्रवेश केला.
घरातील सामानाची उचकापाचक करून बेडरुम मधील कपाटातील अकरा हजार पाचशे रुपये रोख रक्कम चोरून नेले. ही घटना सुखवस्तू अपार्टमेंट, पावबाकी रोड, माथाडी मळा, राजाराम सुपर शोपी मार्केट, संगमनेर मागे घडली.
या बाबतची माहिती अशी की श्रीमती सरोजिनी शंभू राव देशमुख ( वय 70, रा.राजाराम सुपर शॉपी मागे) यांच्या बंद घराचे कुलूप लावलेला कोयंडा अज्ञात चोराने कशाने तरी उचकटून आत प्रवेश केला. कपाटातील अकरा हजार पाचशे रुपये रोख रक्कम चोरून नेली.
या प्रकरणी सरोजनी देशमुख यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भा द वि कलम 457, 380 प्रमाणे घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास सहाय्यक फौजदार फटांगरे हे करीत आहेत