प्रवासी व्यक्तीने फोन करण्याच्या बहाण्याने मोबाईल चोरी

। अहमदनगर । दि.29 मार्च । गाडीत प्रवासी म्हणून बसलेल्या इसमाने फोन करण्याच्या बहाण्याने मोबाईल घेऊन पाच हजार रुपये किंमतीचा होनर कंपनीचा मोबाईल चोरून नेला. ही घटना नेहरू मार्केट येथे शनिवारी (दि.27) सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी घडली.


याबाबतची अधिक माहिती अशी की सुनील महादेव कापसे (वय 25 रा. हरदेव निवास, गजानन कॉलनी, डी मार्केट समोर, काळेवाडी, पुणे) यांनी त्यांच्या गाडीमध्ये प्रवासी म्हणून बसविलेल्या धोंडे ( पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही ) या इसमाने नगर मधील चितळी रोड वरील नेहरू मार्केट जवळ कापसे यांना फोन करायचा आहे.

तुमचा मोबाईल दाखवा असे म्हणून त्यांच्याकडून पाच हजार रुपये किंमतीचा होनर कंपनीचा मोबाइल घेतला. फोन करण्याच्या बहाण्याने मोबाईल चोरुन नेला.  याप्रकरणी सुनील कापसे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी भा द वि कलम 379  प्रमाणे चोरीचा गुन्हा नोंद केली असून अधिक तपास पोलीस हवालदार काळे हे करीत आहेत.

 


 

 

 

Post a Comment

Previous Post Next Post