। अहमदनगर । दि.29 मार्च । नगर-दौंड रोडने भरधाव वेगात येणार्या स्कार्पिओ गाडीने पुढे चाललेल्या लूना मोपेडला धडक दिली. या धडकेत मोपेडस्वार गंभीर जखमी होऊन मयत झाला. ही घटना नगर दौंड रोड वरील बाबुर्डी बेंद फाट्याजवळ एम. एस. ई. बी.पावर हाऊस जवळ घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की चक्रपाणी नागराज कपाटे (वय 60 रा.पांढरेवाडी कोळगाव ता.श्रीगोंदा) हे त्यांच्या लुना मोपेडं वरून नगर - दौंड रोड अरणगावकडे येत असताना बाबुर्डी बेंड शिवारातील बाबुर्डी फाट्याजवळ ए. एस. ई. बी पावर हाऊस जवळ पाठीमागून आलेल्या स्कार्पिओ गाडीने त्यांना पाठीमागून धडक दिली.
या धडकेत चक्रपाणी कपाटे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले असता, औषधोपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाणयात चक्रपाणी कपाटे (वय 52 रा.पांढरेवाडी कोळगाव) यांच्या
फिर्यादीवरून स्कार्पिओ चालक सागर बाळू नवले (रा. आढळगाव तालुका श्रीगोंदा ) यांच्याविरुद्ध भा द वि कलम 304 (अ) 279, 337,338,मोटार वाहन कायदा कलम 184 177 प्रमाणे अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास सहाय्यक फौजदार लबडे हे करीत आहेत.
