। पुणे । दि.25 मार्च । इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाकडून खेळणाऱ्या श्रेयस अय्यरला गंभीर दुखापत झाली. श्रेयसवर शस्त्रक्रिया केली जाणार असून या शस्त्रक्रियेनंतर त्याला पूर्ण बरे होण्यास वेळ लागेल.
यामुळे श्रेयस अय्यर इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील बाकीचे सामने खेळणार नाही. तसेच दुखापतीतून सावरण्यास आणखी वेळ लागल्यास ९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेच्या सुरुवातीलाही श्रेयसला खेळता येणार नाही, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, श्रेयस अय्यर हा दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार आणि प्रमुख फलंदाज आहे. तो दुखापतीमुळे खेळू शकला नाही तर हा दिल्ली कॅपिटल्स संघासाठी मोठा धक्का ठरण्याची शक्यता आहे.
