केडगावमध्ये थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडले

। अहमदनगर । दि.27 मार्च । मालमत्ताकराच्या वसुलीसाठी महानगर पालिकेने आता नळजोड तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. केडगाव भागातील ८ जणांचे नळकनेक्शन तोडण्याची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती महानगरपालिकेने दिली आहे. 

महापालिकेने मालमत्ता कराच्या वसुलीसाठी कारवाई सुरू केली. आठ जणांचे कनेक्शन कट केले आहेत. बबन ढवळे, लक्ष्मण चत्तर, चंद्रकला गीते, दादासाहेब सूर्यवंशी, ताराबाई महाजन, ओम कन्स्ट्रक्शन, एकनाथ गायकवाड, तानाजी साठे यांच्याकडे थकबाकी होती. 

मनपाच्या पथकाने शुक्रवारी नळजोड कनेक्शन तोडण्याची कारवाई केली. प्रभाग अधिकारी नाना गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली केडगाव विभागप्रमुख सुखदेव गुंड, लिपीक भरत काकडे, सुनिल सातपुते, आबासाहेब होळकर, बाबासाहेब हराळ, राजू गुंड, सुदाम कासार, कचरू कोतकर, नरेंद्र लगड, मच्छिंद्र हुलगे आदी कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

Previous Post Next Post