नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात कांदा लिलाव आठवडाभर बंद

। अहमदनगर । दि.26 मार्च । कृषी उत्पन्न बाजार समितीचा नेप्ती उपबाजारातील कांदा लिलाव आठवडाभर बंद राहणार आहेत. दि.26 मार्च ते दि.1 एप्रिल पर्यंत सर्व बँकांना सुट्टी

असल्यामुळे व्यापार्‍यांना आर्थिक अडचणीमुळे शेतकर्‍यांचे पेमेंट देण्यास अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे नेप्ती उपबाजार येथे 26 मार्च ते 1 एप्रिल पर्यंत होणारे कांदा लिलाव बंद राहणार आहेत.

तरी शेतकर्‍यांनी आपला माल सदर कालावधीमध्ये विक्रीस आणू नये. तसेच दि.2 एप्रिल पासून नेप्ती उपबाजार येथील बाजार नियमीत पुर्ववत चालू राहील. याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी, असे आवाहन बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post