। सातारा । दि.26 मार्च । भाजपचे राज्यसभेचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यातील मैत्री सर्वांना परिचित आहे. खा. उदयनराजे व ना. शंभूराज देसाई हे वेगवेगळ्या पक्षात असले तरी दोघेही नेहमी एकमेकांचा आदर ठेवतात. त्यांनी अडचणीच्या काळात एकमेकांना मदतही केली आहे.
ना. शंभूराज देसाई एका लग्न समारंभासाठी कोल्हापूरला जात होते. योगायोगाने खा. उदयनराजे भोसले हे देखील गोव्याच्या दिशेने चालले होते. वाटेत ना. देसाई यांच्या गाड्यांचा ताफा दिसल्यानंतर उदयनराजेंनी त्यांची गाडीही ताफ्यासोबत घेतली.
त्यानंतर कोल्हापूरनजीक शिरोळ एम.आय.डी.सी. महामार्गावर उदयनराजेंना पाहून ना. देसाईंनी त्यांची गाडी थांबवली. ना. देसाई यांनी उदयनराजेंना भररस्त्यात मुजरा केला, तेव्हा हा क्षण फोटोत कैद झाला.
