। अहमदनगर । दि.28 मार्च । येथील तनपुर वाडी शिवारातील मूकबधिर शाळा जवळील पोलवरील पंधरा हजार रुपये किमतीची तीस किलो वजनाचे कॉपर वाइंडिंग अज्ञात चोराने 25 केवी एक क्षमतेच्या रोहितची विद्युत पुरवठा बंद करून पोल खाली पडून आतील शंभर लिटर ऑईलचे नुकसान केले. व कॉपर वायर चोरून नेली.
याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी मयूर रमेश जाधव ( वय.28 रा. चाळीसगाव, आनंदनगर पाथर्डी ) यांच्या फिर्यादीवरून भादवि कलम 379,427 प्रमाणे चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास सहाय्यक फौजदार गोल्हार हे करीत आहेत.
