कायनेटिक चौकातून इसम बेपत्ता

 । अहमदनगर । दि.28 मार्च ।  एमआयडीसीतील कंपनीत कामाला जातो असे समजून घराबाहेर गेलेला तीस वर्षीय मुजीब शेख अद्याप परतला नाही ही घटना दिनांक 24 दुपारी चार वाजता नगर पुणे रोड वरील कायनेटिक चौक भट्टी आव्हाड वीट भट्टी येथे घडली.

याबाबत मुजीब शेख यांचे सासरे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी हरविल्याची नोंद घेतली याबाबत अधिक तपास सहाय्यक फौजदार शिंदे हे करीत आहेत.

त्यांची उंची पाच फूट पाच इंच रंग सावळा शरीरबांधा मध्यम केस काळे सरक अंगात पॅन्ट शर्ट पायात चप्पल असे वर्णन आहे. ही व्यक्ती कोणाला कळले किंवा त्याबाबत कुणाला काही माहिती असेल

त्यांनी कोतवाली पोलीस ठाणे फोन 0241 2416117 व सहाय्यक फौजदार  शिंदे मोबाईल नंबर 9270861399 वर संपर्क करावा असे आवाहन कोतवाली पोलीस यांनी केले आहे आहे.

Post a Comment

Previous Post Next Post