। अहमदनगर । दि.26 मार्च । भरधाव वेगातील मालवाहू टेम्पोने बुलेट मोटरसायकल धडक दिली या धडकेत मोटरसायकल स्वार गंभीर जखमी झाला. ही घटना नगर मनमाड रोड वरील सह्याद्री चौकातील माऊली हॉटेल समोर घडली.
शिवाजी किसन कोलते ( रा. बोल्हेगाव ) हा बुलेट मोटरसायकल ( क्र. एम एच 1634 ) पेट्रोल भरण्यासाठी जात असताना मालवाहू टेंपोने धडक दिली.या धडकेत शिवाजी कोलते हा जखमी झाला.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी सदाशिव कोलते त्याच्या फिर्यादीवरून अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलीस नाईक दाताळ हे करीत आहेत.
