। अहमदनगर । दि.02 फेब्रुवारी । भरधाव वेगातील मालट्रकने पुढे चाललेल्या मोटारसायकलला पाठीमागुन जोरात धडक दिली.
या धडकेत मोटार सायकलस्वार रणजीत निकम (वय 28, रा.विळद) यांचा जागीच मृत्यू झाला. हि घटना मनमाड-रोडवरील विळद शिवरात जवरे वस्ती जवळ शनिवारी (दि.30) रोजी सायंकाळी घडली.
रणजीत निकम हे त्यांची मोटारसायकल (क्र.एम.एच.17 ए.ए.506) वरुन जात असताना पाठीमागुन आलेल्या मालट्रकने (क्र.टी.एन 18 झेड 1165) ने पाठीमागुन धडक दिली. या धडकेत निकम यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अपघाताच्या गुन्हयाची नोंद केली असुन अधिक तपास हे कॉ.पवार करीत आहेत.
