। अहमदनगर । दि.18 फेब्रुवारी । रस्त्याच्या कडेेला उभी असलेल्या कारची काच फोडून अज्ञात चोरानी कारमधील 2 लाख 55 हजार रुपये असेली बॅक चोेरुन नेेली. हि घटना लालटाकी परिसरातील सर्जेपुरा अप्पू हत्तीचौक दरम्यान, सुदर्शन निवास समोर बुधवारी (दि.17) रोजी दुपारी एक वाजता घडली.
या बाबतची माहिती अशी की, गणेश लक्ष्मणराव ताठे (वय 49, रा.भूतकरवाडी, बालिकाश्रमरोड, नगर) यांनी अप्पू हत्ती चौक दरम्यान, त्यांची डस्टर कार (क्र.एम.एच.16 ए.टी.9651) ही सर्जेपुरा चौका दरम्यान असलेल्या सुदर्शन निवास समोर रस्त्याच्या कडेला लॉक करुन ठेवली होती. मात्र अज्ञात चोरानी कारची काच फोडून पाठीमागील सीटवर ठेवलेली 2 लाख 55 हजार रुपये असलेली बॅग चोरुन नेली.
याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी गणेश ताठे यांच्या फिर्यादीवरुन भादवि कलम 379, 427, 34 प्रमाणे गुन्हयाची नोंद केली असून अधिक तपास पोलीस निरिक्षक सोळके हे करीत आहे.
