महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निमगाव वाघात
तालुकास्तरीय निवड चाचणी उत्साहात
रंगतदार कुस्त्यांच्या थराराने ग्रामस्थ मंत्रमुग्ध
नवनिर्वाचित सरपंच रुपाली विजय जाधव यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करुन व कुस्ती लावून निवड चाचणी स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, उपसरपंच अलका गायकवाड, देवाचे भगत नामदेव भुसारे, उद्योजक गोकुळ जाधव, माजी सरपंच साहेबराव बोडखे, अनिल डोंगरे, हर्षवर्धन कोतकर, डॉ. विजय जाधव, सचिव बाळू भापकर, माजी पंचायत समिती सदस्य एकनाथ जाधव, किरण जाधव, पोपट शिंदे, भागचंद जाधव, कोंडीभाऊ फलके, मुन्नाबी शेख, धनंजय खर्से, सोमनाथ राऊत, किसन वाबळे, चंद्रकांत पवार, सुखदेव जाधव, भानुदास ठोकळ, अतुल फलके, लक्ष्मण चौरे, मयुर काळे, विठ्ठल जाधव, रंगनाथ शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच रुपाली जाधव यांनी गावाला उत्कृष्ट कुस्ती मल्लांची परंपरा असून, अनेक खेळाडू गावातून घडले आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खेळाडूंसाठी देखील प्रोत्साह देण्यात येणार असल्याचे सांगितले. पै. नाना डोंगरे यांनी कोरोनामुळे कुस्तीच्या सरावात व स्पर्धेत तब्बल एक वर्षाचा खंड पडला. कुस्तीपटूंनी आपले सराव सुरु ठेऊन होणार्या स्पर्धेत गावाचे नांव उज्वल करण्याचे आवाहन केले.
या निवड चाचणीत नगर तालुक्यातील मल्लांचा उत्सफुर्त सहभाग लाभला. राज्यस्तरीय वरिष्ठ गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97 व महाराष्ट्र केसरी गटसाठी 86 ते 125 किलो वजनगटासाठी (गादी व माती) निवड चाचणी स्पर्धा पार पडल्या. यामध्ये विजयी मल्ल गादी विभागसाठी महेश शेळके, बुध्दभूषण साळवे, सौरभ शिंदे, संदीप डोंगरे,
वैभव फलके, अविनाश मोरे, लौकिक चौगुले, युवराज कर्डिले, माती विभागसाठी वैभव चोपडे, सौरभ मराठे, अक्षय उघडे, विकास गोरे, शुभम वाघ, सुजीत कांडेकर, मनोज फुले तर महाराष्ट्र केसरी गटासाठी मनोहर कर्डिले (माती) व सुदर्शन कोतकर (गादी) या मल्लांची जिल्हा निवडचाचणीसाठी पात्र ठरले आहे. या निवडचाचणीसाठी पंच म्हणून पै.गणेश जाधव व प्रियंका डोंगरे यांनी काम पाहिले.