राशीन येथे डॉक्टरांची पत्नी, दोन मुलांसह आत्महत्या

। अहमदनगर । दि.20 फेब्रुवारी ।  कर्जत तालुक्यातील राशीन येथील प्रसिध्द डॉ. महेंद्र थोरात (वय 46) यांनी राहत्या घरी पत्नी व दोन लहान मुलांना गळफास देऊन स्वत:ही गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली.


शनिवारी पहाटे ही घटना घडली. गळफास घेतलेल्या खोलीच्या दरवाजाला स्टेलो टेपने डायच्या कागदावर त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. राशीनसह परिसरात ही घटना समजताच त्यांच्या हॉस्पिटलसमोर ग्रांमस्थांना गर्दी केली होती.


प्रथमदर्शनी ही आत्महत्या वाटत असली तरी आत्महत्या की घातपात? हे पोलीस तपासात समोर येईल. दरम्यान, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत डॉ. महेंद्र थोरात यांनी म्हटले आहे की, माझा थोरला मुलगा (वय18) कृष्णा याला ऐकण्यास कमी येत असल्याने आम्हाला समाजात अपराध्यासासारखे वाटत आहे.


अनेक दिवसांपासून आम्ही व्यथित आहोत. कृष्णाचेही कशात मन लागत नव्हते. हे आम्ही वडील व आई म्हणून दुख: सहन करू शकत नाही. म्हणून मी व माझी पत्नी वर्षा (वय  39) आत्महत्येसारखे कृत्य करीत आहोत.


हे योग्य नसले तरी नाइलाजावास्तव हे कृत्य करीत आहोत. यात कोणालाही जबाबदार धरू नये असा या चिठ्ठीत उल्लेख केला आहे. कैवल्य हा दुसरा मुलगा आठ वर्षांचा होता. पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी सुरू केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post