लक्ष्मणराव तांदळे यांचे वृद्धापकाळाने निधन

। अहमदनगर ।  दि.19  फेब्रुवारी ।  नगर येथील सेवानिवृत्त एसटी कर्मचारी लक्ष्मणराव भानुदास तांदळे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या मागे दोन मुले, सून नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. 

लक्ष्मणराव हे विद्याव्यासंगी आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाचे होते. त्यांचा मोठा स्नेह परिवार होता. त्यांच्यावर येथील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post