। अहमदनगर । दि.25 जानेवारी । घराबाहेर रस्त्याच्या कडेला उभी केलेल्या कारमधुन साडेसात हजार रुपये किंमतीचे टेप, एम्प्लीफायर, बॅटरी क्लोअर सिस्टिम असे साहित्य अज्ञात चोरानी चोरुन नेले हि घटना पाईपलाईन रोड वरील नित्यसेवा चौकात शनिवारी (दि.23) रोजी रात्री साडेअकरा ते रविवार (दि.24) साडे दहा वाजल्याच्या दरम्यान घडली.
या बाबतची माहिती अशी की, गणेश भगवान बांगर (वय 31, रा.नित्यसेवा चौक, पाईपलाईन रोड, सावेडी) यांनी त्यांची ओमेनी कार घराबाहेर उभी केली असता कोणीतरी अज्ञात चोरानी कारमधील पायनर कंपनीचा टेप, सोनी कंपनीचा एम्प्लीफयर, बॅटरी, क्लोअर सिस्टीम असे साडेसात हजार रुपयो इलेक्ट्रीक साहित्य चोरुन नेले आहे.
या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी गणेश बांगर यांच्या फिर्यादीवरुन भादंवि कलम 379 प्रमाणे चोरीच्या गुन्हयाची नोंद केली असुन अधिक तपास हेड कॉस्टेबल पानसरे हे करीत आहेत.
