। कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाचा उपक्रम
। नगरची हिस साक्षी जाधव उत्तेजनार्थ
। अहमदनगर । दि.13 जानेवारी । महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अद्यापक संघाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित राज्यस्तरीय कनिष्ठ महाविद्यालय हिंदी वक्कृत्व स्पर्धेत मुंबई, वाशी येथील सी एल ई एस मोतीलाल झुनझुनवाला कॉलेजची शिक्षा चौधरी हिने प्रथम क्रमांक पटकाविला.
राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाचे वक्कृत्व स्पर्धा दि.11 जानेवरी रोजी ऑनलाइन घेण्यात आल्या. यासाठी प्रत्येक विभागातून प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या अशा नऊ विभागातील 25 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक बोर्डच्या अध्यक्षा श्रीमती शंकुतला काळे होत्या तर प्रमुख अतिथि म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे सहायक आयुक्त अनिल गुंजाळ होते.
तसेच हिंदी अध्यापक संघाचे राज्य अध्यक्ष डॉ.मिलिंद कांबळे, सचिव प्रा. रेवणनाथ कर्डिले, कार्याध्यक्ष प्रा. सुंदर लोढे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हेमलता पाटील, प्रा. संजय पवार यांनी केले. अतिथि परिचय डॉ. राजकुमार कांबळे, डॉ. वंदना पावसकर व प्रा. संजय गांवकर यांनी करून दिला.
कार्यक्रममाचे प्रास्ताविक डॉ. मिलिंद कांबळे यांनी केले व संघाने लॉकडाऊनमध्ये केलेल्या कामाचा आढावा सांगितला. कार्यकमाचे अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे व. अनिल गुंजाळ यांनी आपल्या भाषणात संघाच्या कामाची स्तुती करून मुलांना शुभेच्छा दिल्या.
या वेळी परिक्षक म्हणून प्रा.डॉ.अशोक मर्डे (उस्मानाबाद), प्रा.डा.रमेश शिंदे (औरंगाबाद )डॉ.सूरज चौगुले (कोल्हापूर ) यांनी केले. तसेच विनोद डोमकावळे, व प्रा. सुदाम पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.पी.डी.घुगे,प्रा.इलाही मुलानी,प्रा.असिफ शेख,प्रा. विश्वनाथ मरतुले,डॉ. मिलिंद कदम,प्रा. नंदा गायकवाड,प्रा. हसन शेख, सर्व विभागाध्यक्ष, जिलाध्यक्ष यांनी काम केले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातील जवळपास 150 हून अधिक प्राध्यापक व विद्यार्थी हजर होते.
स्पर्धेत विजयी विद्यार्थी : प्रथम क्रमांक मुंबई विभाग-शिक्षा कैलाश चौधरी, सी एल ई एस मोतीलाल झुनझुनवाला कॉलेज ,वाशी.
द्वितीय क्रमांक- कोल्हापुर विभाग- माधुरी महेंद्रकुमार ननावरे, मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण, तालुका:- फलटण, जिल्हा:- सातारा तृतीय क्रमांक- औरंगाबाद विभाग- कु.शिवानी विजय साबळे नवभारत कालेज टेंभुर्णी जालना.
उत्तेजनार्थ क्रमांक - पुणे विभाग- साक्षी कृष्णसुदाम जाधव, भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री कनिष्ठ महविद्यालय, संगमनेर ता. संगमनेर, जि. अहमदनगर
