। अहमदनगर । दि.15 जानेवारी । भरधाव वेगातील बस अचानक वळून रस्त्याच्या मध्ये आल्यावर ब्रेक दाबल्याने बसने समोरुन आलेल्या मोटार सायकलस्वाराला धडक दिली. या धडकेमध्ये किरण गुलबराव वाकळे (वय 25, रा. सावेडी) याचा मृत्यू झाला. हि घटना पाईपलाईन रोडवरील यशोदानगर समोर घडली.
या बाबतची अधिक माहिती अशी की, एसटी बस (क्र.एम.एच.12 के.क्यू 2967) पाईपलाईन रोडने वेगात जात असताना चालकाने वळण्याचा इशारा किंवा वळण्यासाठी इंडिगेटर न देता अचानक वळून रोडच्यामध्ये आल्यावर चालकाने ब्रेक दाबला त्यामुळे समोरुन आलेल्या मोटार - सायकलला धडक बसली. या धडकेत किरण गुलाबराव वाकळे याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी रविंद्र विलास वाकळे यांच्या फिर्यादीवरुन भादविक 304 (अ) 279,337, 338, 427, मोटार वाहन कायदा कलम 134(अ)(ब) 184,177 प्रमाणे अपघाताच्या गुन्हयाची नोंद केली असुन अधिक तपास पोलीस नाईक जाधव हे करीत आहेत.
