ट्रकचालकास मारहाण करुन तिघांनी लुटले

। अहमदनगर । दि.25 जानेवारी । लघुशंकेस थांबलेल्या ट्रकचालक व शेतकर्‍यास तीन अज्ञात चोरट्यांनी मारहाण करुन त्यांच्या कडील रोकड, मोबाईल, अधारकार्ड यांची बळजबरीने चोरी केली हि घटना नगर - मनमाड रोडवर राहुरी फॅक्टरी जवळ असलेल्या जम्मू चौधरी ढाब्या जवळ शनिवारी (दि.23) रोजी रात्री घडली.


याबाबतची माहिती अशी की, संतोष बाबासाहेब कटारे (वय 30, रा.हिलालपूर, औरंगाबाद) हे ट्रकने मनमाड रोडने जात असताना राहुरी फॅक्टरी जवळील ढाब्या जवळ ते लघुशंकेसाठी थांबले.


त्यावेळेस नंबर नसलेल्या मोटार सायकवरुन तीन अनोळखी इसम आले. त्यांनी कटारे व ट्रकचालक यांना मारहाण केली. त्यांच्या जवळील 17 हजार 500 रुपये, मोबाईल, आधारकार्ड, ट्रकचालक, शशीकांत पवार यांचे कडील दोन हजार सातशे रुपये बळजबरीने चोरुन नेले.


या प्रकरणी  राहुरी पोलिसांनी गुन्हयाची नोंद केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post