चोरट्यांनी घर फोडुन 70 हजाराच्या रक्कमेवर मारला डल्ला

। अहमदनगर । दि.15 जानेवारी ।येथील नालेगाव भागातील सांगळेगल्लीत चोरट्यांनी घर फोडून 70 हजारांची रोकड चोरुन नेली आहे.

या प्रकरणी घरमालक राहुल रमेश भागवत (वय 35,रा.नालेगाव) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांवर घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी घरी नसताना चोरट्यांनी रात्रीच्यावेळी त्यांच्या घराचा दारवाजा तोडून घरातील समानाची उचकापाचक केली. चोरट्यांच्या हाती 70 हजार रुपयांचे रक्कम लागली.

चोरट्यांनी ती रक्कम घेवुन पोबारा केला. घटनास्थळी शहर पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस नाईक मुकुंद दुधाळ करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post