नगर, (दि.27 नोव्हेंबर) : शहरातीन बालिकाश्रम रोडवर धुमस्टाईलने गंठण लांबविल्याची घटना घडली आहे. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतची फिर्याद मदुरा रोहित कुलकर्णी (वय 30, रा. बालिकाश्रम रोड, आराधना स्टेट बँक कॉलनी, अहमदनगर) यांनी दिली आहे.
मदुरा कुलकर्णी या दि. 26 नोव्हेंबर रोजी लिंकरोडने दुचाकीवरून घरी जात होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या विना नंबरच्या मोटारसायकलवरून तिघे आले. त्यातील पाठीमागे बसलेल्या इसमाने कुलकर्णी यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण हिसका मारून चोरून नेले. घटनेचा पुढील तपास पोना. शिरसाठ हे करत आहेत.
