जिल्हा हिवताप अधिकारी 80 हजाराची लाच घेताना पकडले



नगर, (दि.26 नोव्हेंबर)  : आजापरणाचे रजेवरच्या कालावधीतील वेतन काढल्याचे काम केले म्हणून 80 हजार रुपयांची लाच घेताना जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.रंजनी रामदास खुणे (वय 57, रा.संगमनेर, ता.संगमनेर, जि.अहमदनगर) यांना सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगहात पकडले आहे.
 

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य सहाय्यक म्हणून तक्रारदार नोकरीस असुन, ते दि.1 सप्टेंबर 2014 ते 16 जानेवारी 2015 दरम्यान, आजारीपणाचे रजेवर होते. याच कालावधीमधील वेतन त्यांना मिळले नव्हते. वेतन मिळण्याकरिता त्यांनी 2019 मध्ये जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.खुणे यांना अर्ज दिला होता.

त्यानंतर डॉ.खुणे यांनी सदर कालावधीचे वेतन रुपये 1 लाख 39 हजार रुपये काढुन तक्रादार यांचे बँक खात्यात दि.19 नोव्हेंंबर 2020 रोजी जमा केले होते. वेतन काढल्याचे काम केले म्हणुन यातील डॉ.खुणे यांनी तक्रारदार यांच्याकडे वेतनाच्या रक्कमेतील 60 टक्के रक्कम (रु.84000/-) ची मागणी केली. 


तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर दि.26 नाव्हेंबर 2020 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. डॉ.खुणे यांनी पंचासमक्ष वेतन बिलाचे 60 टक्के लाचेची मागणी केली. जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय, चितळेराड, अहमदनगर येथे सापळा लावून कारवाई डॉ.खुणे यांना पंचासमक्ष रुपये 80 हजार रुपयांचे लाचेची रक्कम स्विकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.


लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर, पोलीस निरीक्षक शाम पवरे, पोलीस निरीक्षक यांच्यासह पथकांनी पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर  पोलिस अधिक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी सापळा रचून कारवाई केली.

Post a Comment

Previous Post Next Post