प्रहार संघटनेच्यावतीने रक्तदान शिबीराने स्वातंत्र्य दिन साजरा

 

नगर (दि.16 ऑगस्ट ) : प्रहार संघटनेच्या वतीने स्वातंत्र्य दिन रक्तदान शिबीराने साजरा करण्यात आला. कोरोनाच्या  पार्श्‍वभूमीवर रक्ताचा तुटवडा भासत असताना तपोवन रोड ढवण वस्ती येथे स्व. दिगंबर ढवण यांच्या स्मरणार्थ हा रक्तदान शिबीर घेण्यात आले.

या रक्तदान शिबीरात युवकांनी स्वयंफुर्तीने रक्तदान केले. यावेळी शिबीराचे आयोजक भाग्यश शिंदे, अनील ढवण, जिजाऊ ब्रिगेडचे अनिता काळे, क्रांती संघटनेचे आणिक भोंड, मायाताई कोल्हे, संतोष पवार, विनोदसिंग परदेशी, प्रकाश बेरड, डॉ.संध्या रतगोले, बंटी ढवण, चंदू राके, गणेश चव्हाण, ऋषी ढवण, विनायक गांधी, बाळू चव्हाण, सचिन गांधी, मनीषा गांधी, भाग्यश्री शिवे, अशोक शिंदे आदी उपस्थित होते. रक्तदान शिबीराचे प्रारंभ स्व.दिगंबर ढवण यांना श्रध्दांजली वाहून करण्यात आली.

भाग्यश शिंदे म्हणाले की, देश कठिण प्रसंगातून जात असताना प्रत्येक नागरिकांने आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. स्व.दिगंबर ढवण यांनी सामाजिक कार्याला नेहमीच प्राधान्य दिले. देशसेवा म्हणूनच ते सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असत. त्यांचे कार्य युवकांना प्रेरणा देणारे असून, त्यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीर घेण्यात आल्याचे  त्यांनी  सांगितले. या रक्तदान शिबीरासाठी भाग्येश गीते मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ  तपोवन  हडको  यांचे  सहकार्य लाभले. 

Post a Comment

Previous Post Next Post