सिटी केअर हॉस्पिटलमध्ये न्यूरोसर्जन डॉ.आकाश दांगट पूर्णवेळ रूजू

नगर, ( दि. 02 जुलै ) : नगरच्या तारकपूर परिसरातील सिटी केअर हॉस्पिटलमध्ये मेंदू विकारावरील परिणामकारक उपचारासाठी पूर्णवेळ न्यूरोसर्जनची सेवा उपलब्ध झाली आहे. न्यूरोसर्जन डॉ.आकाश दांगट हे सिटी केअरमध्ये रुजू झाले असून त्यांच्या अनुभवाचा लाभ मेंदू विकार असलेल्या रूग्णांना घेता येणार आहे, अशी माहिती डॉ.संदीप सुराणा यांनी दिली.

डॉ.आकाश दांगट यांचे शालेय शिक्षण ठाणे येथे झालेले असून 2005 मध्ये त्यांनी सोलापूर येथील शासकीय मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस.ची पदवी मिळवली. त्यांनी एक वर्ष औरंगाबादला वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा दिली. 
 
यानंतर त्यांनी हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलमध्ये सहा वर्षांचा डी.एन.बी. न्युरोसर्जरीचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांना टेक्सास येथील फेलोशीप मिळालेली असून अमेरिकन सोसायटी ऑफ न्यूरोसर्जनचे ते सदस्य आहेत. अपघातग्रस्त हेड सर्जरी, रेडिओ सर्जरी तसेच स्कल बेस सर्जरीत त्यांचा विशेष हातखंडा आहे. त्यांच्या अत्याधुनिक आणि अनुभवी प्रॅक्टिसचा लाभ आता सिटी केअरच्या माध्यमातून रूग्णांना होणार आहे. ते सिटी केअरमध्ये पूर्णवेळ उपलब्ध असल्याने मेंदू विकारावरील निदान व उपचारांसाठी आता रूग्णांना पुण्या, मुंबईला धावपळ करण्याची गरज भासणार नाही. या सेवेचा रूग्णांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन सिटी केअर हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post