नगर,(दि.02 जुलै) : नगर शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असून आरोग्य यंत्रणे बरोबरच आता पोलिस यंत्रणाही सतर्क झाली आहे. नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनांवर कारवाई करीत पोलिसही कारवाईसाठी सरसावले आहे. आज जवळपास 73 वाहनांवर कारवाई करण्यात आली.
शहर आणि उपनगरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने नालेगाव, सिध्दार्थनगर, तोफखाना, पद्मानगर यातील काही परिसर कंटेन्मेंट व बफर झोन म्हणून घोषित केले आहे.
मात्र, शहरात वाहनचालक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे वारंवार निदर्शनात आल्याने ही कारवाई सुरु करण्यात आली आहे. कोतवाली पोलिसांनी आज सकाळी आयुर्वेद चौकासह विविध ठिकाणी वाहनांची तपासणी केली. यामध्ये नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनांविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.
तसेच कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 46 वाहनांविरुध्द 188 प्रमाणे कारवाई केली. पोलिसांनी सुरु केलेल्या या कारवाईने नियमांचेउल्लंघन करणार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Tags:
Crime