पांढरीपूल परिसरात टँकेरच्या धडकेत 5 मेंढ्या ठार

नगर, (दि.07 जूलै) :  येथील नगर - औरंगाबाद मार्गावर पांढरीपूल परिसरात शुक्रवार (दि.03) रोजी टँकरने धडक दिल्याने या धडकेत 5 मेंढ्या जागीच ठार झाल्या आहे. तर दोन मेंढ्या जखमी झाल्या.

पांढरीपूल परिसरात असलेल्या सिंहगड हॉटेलसमोर हा अपघात घडला. भरधाव वेगात जाणार्‍या टँकरने जोराची धडक दिल्याने भीमसेन सूळ - खोसपुरी या मेंढपाळाच्या 5 मेंढ्या जागीच ठार झाल्या. तर दोन मेंढ्या जखमी झाल्या. यानंतर स्थानिक नागरिकांनी टँकर पकडून रस्त्याच्या कडेला उभा केला.

पावसाने परिसरात गवत मोठ्या प्रमाणात उगवले असून मेंढपाळ आपल्या मेंढ्या चारण्यासाठी घेऊन जात असतात परंतु रस्ता ओलांडत असताना हा अपघात घडला असल्याची माहिती समजली.

एमआयडीसी पोलिसांनी भीमसेन गंगाराम सूळ यांच्या फिर्यादीवरुन टँकरचालक गौरव चंद्रदेव सिंग याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला.

Post a Comment

Previous Post Next Post