घरोघरी झालेल्या लाक्षणिक उपोषणात
शहरातील तीन हजार विडी कामगार महिलांचा सहभाग
लॉकडाऊनमध्ये उदरनिर्वाहासाठी विडी कामगारांना
रोजगार व विडी विक्री करण्यास परवानगी देण्याची मागणी
नगर, (दि.20) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनला सुरुवात झाली असून, या लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असलेल्या विडी कामगारांचा रोजगार बुडाला आहे. परिणामी त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र व राज्य सरकारने तातडीने विडी कामगारांना रोजगार (काम) मिळवून द्यावा व विडी विक्री करण्यास परवानगी देण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यासह शहरात महाराष्ट्र राज्य विडी कामगार फेडरेशन, लालबावटा विडी कामगार युनियन (आयटक) व नगर विडी कामगार संघटना (इंटक) च्या वतीने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी घरोघरी विडी कामगारांनी लाक्षणिक उपोषण केले. या आंदोलनात शहरातील तीन हजारपेक्षा जास्त विडी कामगार महिला सहभागी झाल्या होत्या.
केंद्र व राज्य सरकारकडून विडी कामगारांना कोणतीही आर्थिक मदत देण्यात आलेली नाही. तसेच विडी मालकाकडून ही मदत मिळालेली नाही. विडी कामगार सामाजिक व आर्थिक दुर्बल घटक असून, यामध्ये 99% विडी कामगार महिला आहेत. अशा परिस्थितीत कामगारांच्या कुटुंबांची उपासमारी चालू आहे. केंद्र व राज्य सरकारने विडी कामगारांचे आर्थिक व सामाजिक परिस्थितीचा विचार करून त्यांना त्वरित आर्थिक मदत करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.तसेच महाराष्ट्र सरकारने विडी कामगारांना 2 हजार रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे.
शहरात झालेल्या या आंदोलनात फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी तथा विडी कामगार नेते कॉ.शंकर न्यालपेल्ली, अॅड.सुधीर टोकेकर, शंरराव मंगलारप, कॉ.बहिरनाथ वाकळे, संगिता कोंडा, कमलाबाई दोंता, लक्ष्मी कोटा, सरोजनी दिकोंडा, बुचम्मा श्रीमल, निर्मला न्यालपेल्ली, लक्ष्मी न्यालपेल्ली, शामला म्याकल, सुमित्रा जिंदम, लिला भारताल, शोभा बीमन, शमीम शेख, सगुना श्रीमल, कविता मच्चा, लक्ष्मी कोडम, शारदा बोगा, भारती न्यालपेल्ली, शारदा सुंकी, कल्पना मुत्याल, जयश्री मुत्याल आदि शहरातील विडी कामगार महिला सहभागी झाल्या होत्या.

Tags:
Ahmednagar