नगर (दि.29) : शहरातील पत्रकार शिवाजी साळुंके यांच्या मारहाण प्रकरणी आरोपी आबा सखाराम औटी, भरत गणपत औटी, ज्ञानदेव आण्णा औटी या तिघांना जेरबंद केल्याची माहिती या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक संजय सातव यांनी दिली. तर उर्वरित दोन आरोपी देखील लवकरच जेरबंद करू असे सातव यांनी सांगितले.
पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. विठ्ठल पाटील, कर्जत येथील उपअधीक्षक कार्यालयातील कर्मचारी पोकॉ. हृदय घोडके, पोकॉ. संतोष साबळे, पोना संदीप पितळे, पोकॉ. किरण जाधव या पथकाने हे आरोपी जेरबंद केले. पत्रकार साळुंके हे औटेवाडी येथील चारीला पडलेल्या भगदाडाची बातमी घेण्यासाठी गेले असता फोटो काढल्याचा राग येऊन पाच जणांनी त्यांना मारहाण केली होती.
याप्रकरणी साळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात पत्रकार संरक्षण अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची तपासी अधिकारी उपअधीक्षक संजय सातव यांनी गंभीर दखल घेत तात्काळ आरोपी अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार काल पहाटे या मारहाण प्रकरणातील तीन आरोपी जेरबंद करण्यात आले आहेत.