आजोळी अडकून पडले होते ४५ दिवस
नगर (दि.28) : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. त्या पार्शभूमीवर अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणी अडकले आहेत. त्यांची आपल्या घराकडे परतण्यासाठी मोठी धडपड सुरु आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात देखील अशाच प्रकारे दोन मुलं मागील 45 दिवसांपासून आपल्या आजोळी अडकले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या मदतीने अखेर या मायलेकरांची भेट झाली आहे.
मुळचे भिंगार येथे राहणार्या व हल्ली पुण्यातील खराडी भागात राहणार्या सुरेखा आणि श्रीकांत तेली या दाम्पत्याची कियान आणि किमया अशी दोन मुले आहेत. हे दोघे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात अंधानेर या गावी आपल्या आजीकडे गेली होती. दोन्ही मुले तिकडे गेल्यानंतर कोरोनामुळे देशभरात टाळेबंदी लागू झाली. अवघा 6 वर्षांचा कियान आणि 9 वर्षांची ही मुले आज- उद्या जाता येईल म्हणत वाट बघत होती. मात्र, दिवसामागून दिवस उलटत असताना वाहतूक काही सुरु होईना. आधी 21 दिवस असलेली टाळेबंदी पुन्हा वाढली. त्यानंतर तर दोन्ही मुले आई - वडिलांच्या आठवणींनी रडू लागली. इकडे आईचा जीवसुद्धा कासावीस झाला. मोबाईलवरुन एकमेकांशी संपर्क होत असला तरी प्रत्यक्ष भेट घेऊन आईच्या कुशीत झेपावण्यासाठी मुलं अक्षरशः व्याकुळ झाली होती. काही मार्गच दिसत नव्हता. त्यामुळे अखेर सुरेखा तेली यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधून ही माहिती दिली.
त्यानंतर खा.सुप्रिया सुळे यांनी दोन्ही जिल्ह्यांतील वरिष्ठ अधिकार्यांशी संपर्क साधून प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यास अपेक्षित यश आले आणि गेले 45 दिवस आईच्या भेटीसाठी आतुर झालेल्या त्या दोन्ही मुलांना पुण्यात आणण्याची परवानगी मिळाली. आवश्यक परवानग्या घेऊन कन्नड तालुक्यातून रवाना झालेली गाडी दोन्ही मुले घेऊन खराडी येथील तेली यांच्या घरी पोहोचली. दारात गाडी पोहोचताच मुलांच्या आणि त्यांच्या आईच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. डोळ्यात आनंद अश्रू आणून सुरेखा तेली यांनी मुलांना कवटाळले आणि खा. सुळे यांचे भरभरून आभार मानले.